“जिचा मुलगा हरवलाय अशा आईची व्याख्या काय? तीसुद्धा कायद्याने ‘अर्धी आई’ होणार?’’
“मग जिचा मुलगा हरवलाय अशा आईची व्याख्या काय, अॅड. फारूक अहमद?’’ तिने फटकन विचारलं, “तीसुद्धा कायद्याने ‘अर्धी आई’ होणार का?’’ अॅड. फारूक अहमद तिच्याकडे वळले. वातावरणात विलक्षण शांतता पसरली. अॅड. फारूक अहमदनी लिहिणं थांबवलं. मूल गेलेलं असो; हरवलं असो अथवा जिवंत असो; एकदा जन्म दिला की आई ही आईच असते. तिला काय उत्तर द्यायचं हे त्यांना सुचेना. हलीमाने मोठाच पेच टाकला होता........